शिवसह्याद्री महानाट्याच्या स्टेजचे शानदार भूमिपूजन
"एक गाव, एक शिवजन्मोत्सव" साजरा करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक 17, 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी स्टेजचे आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, रूपाली जीवन रायते, सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे, कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंडे, उपाध्यक्ष पंकज निकम, शितल निकम, रवींद्र जोशी, रोहिणी रवींद्र जोशी, योगेश गुगना, योगेश घुगे, किरण बडे, यशवंत पवार, नवनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
स्टेजचे भूमिपूजन व शिव अभिषेक यावेळी पार पडल छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला, तसेच पूजेसाठी ठेवलेल्या भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. भूमिपूजन प्रसंगी गणेश आरती, छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक, भवानी तलवार पूजन आणि शिवरायांची आरती घेण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साकारण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेचे लोकार्पण देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रमुख मान्यवर:
- 15 फेब्रुवारी – सातपूर गाव येथे पोवाडा कार्यक्रम
- 17 फेब्रुवारी – शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम
- 18 फेब्रुवारी – शिवपाळणा
- 19 फेब्रुवारी – "शिवसह्याद्री" महानाट्य
या स्टेज भूमिपूजन प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कोर कमिटी आणि सातपूर परिसरातील शिवप्रेमींनी केले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर, श्रीमती हिंदुबाई नागरे, योगिता आहेर, नंदूशेठ जाधव, दिलीप गिरासे, गोकुळी निगळ, स्वप्नील पाटील, राजाराम पाटील निगळ, भगवान काकड, विकास सोनवणे, ऋषाली सोनवणे, गीता जाधव, कल्पना पाटोळे, जानवी तांबे, रोहिणी देवरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ, सचिन आबा गांगुर्डे, निवृत्ती इंगोले, किशोर निकम, संजय राऊत, जी. एस. साळवळे, मुन्ना तुपे, देवा जाधव, दीपक वाकचवरे, वैभव ढिकले, ज्ञानेश्वर निगळ, समाधान देवरे, महेश आहेर, धीरज शेळके, राजेंद्र पाटील, किरण पाटोळे, रवींद्र पाटील, गौरव जाधव, नरेश सोनवणे, हेमंत शिरसाट, शरद शिंदे, रवींद्र देवरे, हिरामन रोकडे, अनिल सोनवणे, चंद्रकिशोर मुंदडा, एकनाथराव तिडके आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज शिवजन्मोत्सव समिती 2025 च्या वतीने शांताराजा मैदान येथे स्टेजचे भूमिपूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक संपन्न झाला.
विशेष कार्यक्रम:
- 15 फेब्रुवारी – स्वप्नीलजी डुंबरे यांचा महाराष्ट्रभर गाजलेला पोवाडा कार्यक्रम
- 17 फेब्रुवारी – सातपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी सामूहिक नृत्य स्पर्धा
- 18 फेब्रुवारी – "महाराष्ट्राच्या पाऊलखुणा" विशेष सादरीकरण, शिवपाळणा, शिवपालखी आणि शिवपूजन सोहळा
- 19 फेब्रुवारी – "शिवसह्याद्री" भव्य महानाट्य
मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करते की, या ऐतिहासिक सोहळ्याला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव दिमाखदारपणे साजरा करावा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!

Post a Comment