सावळ्याची जनू सावली – ताराची शक्कल आणि सावलीची फजिती!

आजच्या भागात आपण बघतो की सावली आणि तारा गच्चीवर कपडे सुकवत असतात. तारा जाणून असते की चष्मा नसला की सावलीला काहीही दिसत नाही. मग ती ठरवते की आज हिला चांगलंच फसवायचं.

सावळ्याची जणू सवली

ती जोरात बादली आपटते.
सावली: "तारा मॅडम हे काय करताय? सगळी कामं मीच करायची का?"
तारा: "अगं थोडीशी मलाही करू दे ना गं!"

तारा मुद्दाम तिच्यासमोर कपडे झटकते, सगळं पाणी चष्म्यावर उडतं. सावली चष्मा काढते तो पुसायला आणि तेवढ्यात तारा तिच्या हातात कपडे देऊन स्वतः गुपचूप तिथून निघून जाते. सावलीच्या हातात चष्मा, दुसऱ्या हातात कपडे – काहीच दिसत नाही. ती ओरडायला लागते,

सावली: "तारा मॅडम, चष्मा द्या मला! काहीच दिसत नाहीये!"

ती फॅनजवळ जाते – फॅन जोरात फिरत असतो. त्या फॅनमध्ये ती हात घालणार इतक्यात सारंग तिथे येतो आणि तिला ओढून घेतो.

सारंग: "काय ग काय करत होतीस तू? काही झालं असतं तर?"
सावली (गदगदून): "माझा चष्मा हरवलाय... मला दिसत नाहीये...!"

खाली घरात सगळे चष्मा शोधत असतात, तारा मात्र कोपऱ्यात उभी असते आणि खुश असते.
बबलू: "सीसीटीव्ही फुटेज चेक करू, कळेल कुणी घेतलाय!"
तारा घाबरते – सीसीटीव्ही आहे हे माहित नव्हतं ना तिला!

इकडे सारंग सावलीला समजावतो,
सारंग: "लेन्सेस लाव, चष्म्याशिवायही जगता येतं."
सावली (रडत): "लहानपणापासून चष्म्यावरून चिडवतात सगळे, आता तुम्हीही तेच..."

सारंग तिचा हात धरून सॉरी म्हणतो.
सारंग: "माझ्याकडून चूक झाली, पुन्हा असं कधीच होणार नाही!"

तितक्यात डॉक्टर येतात आणि सांगतात की संध्याकाळपर्यंत चष्मा मिळेल. घरातली कामं तारा करताना वैतागते.

तारा (स्वतःशी): "सावलीचा चष्मा फोडून मोलकरीणच झाले मी!"
सोहम तिला चहा करायला सांगतो आणि तारा चिडचिडते. तिने चहा करायला सुरुवात केली की त्याला फेकून मारण्याचा विचार करते!

सावली रडून डोळे बंद करून बसलेली असते. सारंग येतो.
सावली: "चला ना लेन्स लावायला!"
सारंग तिच्या नजरेत बघून म्हणतो,
सारंग: "तू माझ्यासाठी लकी आहेस ग सावली!"

त्याला एक आठवण होते – रुमालाची! आणि ती आठवण सावलीने दिलेला "लकी रुमाल" होती.

दुसऱ्या दिवशी तिलोत्तमा गणपती पूजेमध्ये मनोभावे प्रार्थना करते. सगळे ऑफिसच्या महत्वाच्या मीटिंगसाठी निघतात. सावली देवघरात प्रार्थना करते:
सावली: "बाप्पा, सारंग सरांना यश मिळू दे!"

सावली पाहते की रुमाल विसरलेला आहे. ती धावत खाली येते,
अमृता: "कुठे पळतेस?"
सावली: "त्यांचा लकी रुमाल राहिलाय!"

सावली ऑफिसमध्ये पोहोचते, पण वॉचमन तिला आत जाऊ देत नाही. ती म्हणते –
सावली: "मीटिंग संपेपर्यंत थांबण्यात अर्थ नाही... काहीही झालं तरी रुमाल त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा!"

ती ठरवते – जाईलच मी!
आता उद्याच्या भागात बघूया – सावली मीटिंग रूममध्ये शिरते का? तिथे काय होतं?


👉 हा भाग आवडला तर नक्की शेअर करा, follow करा! तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा! धन्यवाद!



No comments

पारू आणि आदित्यचं प्रेम – गैरसमजांच्या वावटळीत! | पारू मालिका आजचा भाग पूर्ण कथा | Full Episode Update

आजच्या पारू मालिकेच्या भागात आदित्य पारूला समजावतो, पण गैरसमज, लपवलेलं सत्य आणि घरच्यांची अपेक्षा यामुळे गोष्टी गुंतागुंतीच्या होतात. वाचा प...

Powered by Blogger.