नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोड येथे 648 वा गुरु रविदास जयंती उत्सव साजरा
नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोड येथे 648 वा गुरु रविदास जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत रविदास हे भारतातील महान संतांपैकी एक होते. त्यांनी आपल्या शब्दांमधून आणि दोह्यांमधून भक्तीचा अनोखा ठसा जगावर उमटवला. आजही लोक त्यांना त्यांच्या अमूल्य विचारांमुळे स्मरतात. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ पौर्णिमेला संत रविदास जयंती साजरी केली जाते. यावर्षी संत रविदास जयंती बुधवार, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.
![]() |
| नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर |
भारतभूमीवर अनेक महान ऋषी आणि संतांचा जन्म झाला, त्यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदासजी यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी संपूर्ण जगाला प्रेम, समता आणि समरसतेचा संदेश दिला. संत रविदासजींनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी, समाज सुधारण्यासाठी आणि समाजकल्याणासाठी समर्पित केले. त्यामुळेच त्यांची जयंती चर्मकार समाजाच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री बबन घोलप, समाधान शूज मठाचे वामनराव अहिरे आणि चर्मकार समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते.

Post a Comment