पारूच्या प्रेमाचा, कर्तव्याचा आणि नात्यांचा संघर्ष – आजचा भावनिक भाग
पारू या मालिकेच्या आजच्या भागात भावनांचा पूर लोटलेला दिसतो. पारूचं मन कासावीस झालेलं असतं कारण मारुतीरावांना ताप आलेला असतो आणि ते काहीही औषध, काढा घ्यायला तयार नसतात. पारू त्यांना आपुलकीने काढा देऊ पाहते पण ते हट्टाने नकार देतात, "मालकीन बाई, तुमच्या हातचं मला काही नको." हे ऐकून पारू गप्प राहते पण आतून तुटलेली असते.
![]() |
पारू 22/06/2025 Episode |
ती गणीला सांगते, "गणी ऐक ना बाळा, तू जा आणि आदित्य सरांना पटकन बोलवून आण." गणी धावत निघतो आणि दुसरीकडे दामिनी आणि परितोषच्या गप्पा सुरू असतात. दामिनी आपल्या स्वप्नातील विमानाच्या कल्पनेत रमलेली असते. ती म्हणते, “विमानाच्या शेपटीवर आपला फोटो लावू.” परितोष तिला आश्वासन देतो, “Done! तुझाच फोटो लागणार.”
पारू दरम्यान आदित्यला घेऊन येते. आदित्य मारुतीरावांना पाहून म्हणतो, “मामा, तुमची तब्येत बघा काय झालीय, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ.” मारुतीराव हट्ट करतात, “मालक नोकराच्या घरी येणं चांगलं नाही.” पण आदित्य त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेतो.
डॉक्टर तपासणी करून सांगतात, “ताप शरीरात मुरलाय, सलाईन लावावी लागेल.” आदित्य म्हणतो, “लावा.” पण मारुतीराव हट्ट करतात, “मला घरी जायचंय.” आदित्य डॉक्टरांना सांगतो, “ignore करा, अॅडमिट करा.”
तितक्यात अहिल्याला फोन करून आदित्य सांगतो, “आई, मामांची तब्येत वाईट आहे.” अहिल्या धडपडते, “जे काही लागेल ते कर. पारूचीही काळजी घे.” दुसरीकडे दामिनी आपल्या विमानाबद्दलच बोलते.
गणी उपाशी असतो. तो पारूला सांगतो, “बाणं सांगितलंय की तुझं खाल्लं तर बा मरणार.” हे ऐकून सगळे हादरतात. पारू स्वतःला दोष देते, “मी नालायक मुलगी आहे.” आदित्य तिला आधार देतो, “प्रेमावर विश्वास ठेव.”
पारू आता बॅग भरायला लागते. गणी विचारतो, “तायडे, तू कुठे चाललीस?” ती म्हणते, “आपण दुसरीकडे राहायला चाललोय.” गणी हट्ट करतो. पारू समजावते, “आपण तिघं जिथे एकत्र, तिथेच आपलं घर.” मारुतीराव हे सगळं ऐकतात.
पारू त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, “बा, तू जिथे सांगशील तिथे मी येईन.” ती त्यांच्या पायावर डोकं ठेवते आणि रडू लागते. मारुतीराव तिच्यावर हात ठेवायचा प्रयत्न करतात पण थांबतात. ते विचारतात, “तुला जमेल का?” पारू म्हणते, “हो बा, मला नक्की जमेल.”
शेवटी मारुतीराव तिच्यावर प्रेमाने हात फिरवतात. बाप-लेकीचा दुरावा मिटतो. पारूला जणू नवजीवन मिळाल्यासारखं वाटतं.
दुसरीकडे दामिनीला परितोष टॉय प्लेन देतो. ती खुश होते, खेळते. पारू, गणी, मारुतीराव आता नवीन जीवनासाठी तयार होतात.
शेवटी एकच भावना उरते – जेव्हा प्रेम खरं असतं, तेव्हा माफ करणं आणि एकत्र राहणं हेच नात्याचं खरं बळ असतं.
Post a Comment