उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री काळाराम मंदिरात दर्शन
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज, मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
महंत सुधीरदास महाराज यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मंदिरात स्वागत केले आणि श्री काळाराम मंदिराच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाबद्दल त्यांना माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी विधिवत पूजा करून राज्याच्या समृद्धीची प्रार्थना केली.
श्री काळाराम मंदिर: नाशिकचे पौराणिक श्रद्धास्थळ
श्री काळाराम मंदिर हे नाशिकमधील एक पवित्र आणि पौराणिक श्रद्धास्थळ आहे. संपूर्ण राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Post a Comment