रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची सूचना
नाशिक: शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिका धारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधन कारक आहे. धान्य वितरण अधिकारी कैलास पवार आणि गणेश जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानाकडे राशन दुकानाकडे जाऊन ई पास मशीनद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून ई केवायसी पूर्ण करावी.
![]() |
| ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक |
रेशन कार्ड धारकांनी विहित मुदतीत ई केवायसी न केल्यास त्यांना अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही.
तसेच ज्या वयोवृद्ध लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण शक्य नाही अशा लाभार्थ्यांची यादी संबंधित कार्यालयात सादर करून त्यांचा धान्य पुरवठा सुरू ठेवण्यात येईल.या संदर्भात शासन स्तरावरून पुढील आदेश लवकरच जाहीर केले जातील. ज्या लहान मुलांचे ई केवायसी झालेले नाही त्यांच्या पालकांनी प्रथम आधार केंद्रावर जाऊन त्यांच्या आधार कार्डची अद्ययावत नोंदणी करावी आणि त्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी जोपर्यंत लहान मुलांची ई केवायसी होत नाही. तोपर्यंत त्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही.असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले शिधापत्रिका धारकांनी कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये म्हणून लवकरात लवकर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई केवायसी पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment