लग्नानंतर होईलच प्रेम | Full Episode | काव्याचे गायब होणे आणि नंदिनीचा निर्णय
आजच्या भागात काव्या गायब झाल्यामुळे संपूर्ण घरात चिंता पसरते. माणिनीचा राग आणि नंदिनीची निर्णयाची घडी! पूर्ण भागासाठी वाचा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’चा आजचा रोमांचक भाग.
भागाची सुरुवात – काव्याचे मनोस्थिती
मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते जेव्हा काव्या चहा घेऊन जीवाच्या रूममध्ये जाण्याचा निर्णय घेते. मनात द्विधा अवस्थेत असलेली काव्या आत येते आणि तेथे हँड मोल्डचे तुकडे, ‘जे’ आणि ‘के’ अक्षरांचे तुकडे पाहून थक्क होते. तिच्या डोळ्यांत अश्रू येतात – कारण ते पहिलं प्रेम ती विसरू शकत नाही.
![]() |
| लग्नानंतर होईलच प्रेम |
जीवाचा हिशोब आणि काव्याची उदासी
जीवाच्या आठवणींनी व्यथित झालेली काव्या हळूहळू रूममध्ये फिरते, तिथे तिला जीव-नंदिनीचा फोटो दिसतो. ती अधिकच अस्वस्थ होते. ती हळूच चहा ठेवते आणि न बोलता रूम सोडते. जीव तिला पाहतो पण ती त्याच्याकडे पाहत नाही. जीव इमोशनल होतो पण काहीच करु शकत नाही.
मालीनी आणि पार्थ यांचं संवाद
माणिनी रूममध्ये विक्रमचा पसारा पाहते आणि पार्थ ऑनलाईन मिटिंगमध्ये ‘जुगाड’ करताना हसत बोलतो. माणिनी त्याला चिडवत विचारते - तू बाबा कडून काही शिकतोस का? पार्थ म्हणतो की काव्या आता खूप बदलली आहे – वटपौर्णिमा पूजा आणि अभ्यास! हे पाहून माणिनी म्हणते, “ही येणाऱ्या वादळाची चाहूल वाटते.”
नंदिनी आणि जीवामधील सुसंवाद - डिवोर्सचा प्रश्न
नंदिनी जीवाला विचारते, “डिवोर्स हवाय का?” ही धक्कादायक विचारणा जीवाला हादरवून टाकते. नंदिनी म्हणते, “माझ्या डोक्यावर अक्षता टाकून मुक्त कर.” जीव उत्तर देऊ शकत नाही. त्यांच्या संवादात भावनांचा कल्लोळ पाहायला मिळतो.
काव्या गायब – सर्वांची चिंता
पार्थ काव्याला शोधतो, पण ती कुठेच सापडत नाही. तिचं सामानही नाही. घरात खळबळ उडते. नंदिनी कॉल करते, पण फोन बंद. जीव लोकेशन पाहतो, पण ती त्याला ब्लॉक केलेली असते. आता सर्वजण चिंतेत असतात.
शारदाच्या घरी काव्याची एन्ट्री
दुसरीकडे, शारदाच्या घरी काव्या पोहोचते. ती शांत असते आणि शारदाला मिठी मारते. शारदाला सगळं काही वेगळं वाटतं. काव्याने घरी येण्याची परवानगी न घेताच केलेला निर्णय शारदाच्या मनात शंका निर्माण करतो.
मालीनीचा संताप
माणिनी रागात विचारते, “का मीच प्रत्येक वेळी समजून घ्यायचं?” ती काव्याच्या लहरी स्वभावामुळे काळजीत असते. जीव, नंदिनी आणि पार्थ सुद्धा गोंधळलेले असतात. माणिनी स्पष्टपणे सांगते, “काव्या काहीही करू शकते.”
शेवटची घडी - काव्याचा कॉल
भागाच्या शेवटी, माणिनीला काव्याचा कॉल येतो. ती विचारते, “तू परत येणार आहेस की नाही?” नंदिनी हे ऐकते आणि ती सुद्धा हादरते.
🔚 पुढील भागात काय घडणार?
नंदिनी घर सोडणार का? जीव काय निर्णय घेणार? काव्या परत येणार का? जाणून घेण्यासाठी वाचत राहा...!

Post a Comment