सावळ्याची जनू सावली – आजचा पूर्ण भाग,
आजच्या भागाची सुरुवात होते ज्या क्षणी सावली स्टेजवर उत्तर देते – "मला विठूरायाने जे दिलं, ते योग्यच दिलं. मला जे जमेल, जे शक्य आहे, तीच गोष्ट विठोबाने दिली. त्यासाठी मी आभारी आहे, आणि मी कुणासारखी व्हावी असं काही नाही. मी समाधानी आहे." हे ऐकून सगळे टाळ्या वाजवतात, तारा घाबरते. सावली तिच्याकडे बघून म्हणते, "माझ्या अपेक्षा संपल्या आहेत." राजकुमार म्हणतो, "क्या बात आहे!"
![]() |
| सावळ्याची जनू सावली |
यानंतर राजकुमार विचारतो सोहमला – "तुला ताराचं गाणं आवडतं म्हणून लग्न केलंस की तारा आवडते म्हणून?" सोहम म्हणतो, "गोड गाणं गाणाऱ्या तारावर प्रेम केलं." सगळे हसायला लागतात. पुढचा टास्क सांगितला जातो – "कँडल लाइट डिनर एन्जॉय करा. डान्स करा."
अमृता डान्स करणार नाही म्हणते, पण सोहम हट्ट करतो. बबलू सांगतो, लाईट ऑफ होईल आणि सगळ्यांनी डान्स करायचा. लाईट जात नाही, सोहम म्हणतो, "इथं कबाब मे हड्डी उभा आहे." मग लाईट ऑफ होतो. सगळे कपल्स डान्स करतात. सावली-सारंग, तारा-सोहम, नील-ऐश्वर्या, अमृता-राजकुमार.
राजकुमार डान्स करत नाही. त्याच्या मनात खूप त्रास असतो. शेवटी तो निघून जातो. अमृता मागे जाते, विचारते "का गडबड आहे?" राजकुमार ओरडतो, "माझ्यावर विश्वास नाही, मी बिझनेस सांभाळू शकत नाही, बाबा होऊ शकत नाही. मी कुठेच योग्य नाही." अमृता त्याला समजावते.
राजकुमार म्हणतो, "बाळ होत नाही म्हणून मला वाऱ्यावर सोडलंय." अमृता म्हणते, "सगळं प्रयत्न करून झालंय, आता देवाच्या हातात आहे." पण राजकुमार अजून चिडतो – "आपण आईबाबा होऊ शकत नाही. हीच खरी गोष्ट आहे. खोट्या आशांमध्ये जगणं थांबव."
राजकुमार अमृताला सांगतो – "तुझ्याशी मी लग्नच का केलं?" हे ऐकून अमृता हादरते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. तिला काही दोष नसतो, पण सगळं तीच सहन करत असते. राजकुमार निघून जातो.
पुढे तारा आणि सोहम एकांतात असतात. सोहम तिला जवळ येतो, पण तारा ऐश्वर्याच्या गुरु मंत्रामुळे त्याला लांब ढकलते. म्हणते, "कुलदैवताचं दर्शन झालं नाही." सोहम चकित होतो. तारा म्हणते, "परंपरा पाळायची आहे."
नील आणि ऐश्वर्याची सीन – नील तिला मिठी मारतो, ती चिडते. नील विचारतो, "मुलाचं नाव घेतलं का?" ऐश्वर्या ते टाळते. नील खुश होतो, पण ऐश्वर्या चिडते. नील झोपायला निघतो. ऐश्वर्या विचार करत झोपते – "सावली आणि सारंग बाळ घेऊन आले तर?" तिला स्वप्न पडतं – सगळे त्यांचं स्वागत करतात. ती चिडते, उठते. म्हणते, "या घरात बाळ होणार नाही, मी असताना."
दुसऱ्या दिवशी अमृता आणि सावली किचनमध्ये असतात. अमृता शांत असते, सावली विचारते, "काय झालं?" अमृता मनातलं काहीच बोलत नाही. सावली समजावते, "पांडुरंगावर विश्वास ठेव."
ऐश्वर्या येते, टोमणे मारते. तिला कुलदैवताचं दर्शन न झाल्याची चिंता असते. तेव्हा सारंग हजर होतो. ऐश्वर्याला चांगलं उत्तर देतो. सर्व हसतात.
जेवताना सावलीच्या हातचं खूप कौतुक होतं. तारा जलते. ऐश्वर्या चिडते. पोह्यात खडा सापडतो. तारा सावलीवर चिडते, पण बबलू सांगतो – "किराणा ऐश्वर्याने आणला."
तारा विचार करते – सावलीने माझ्या चुका दाखवल्या, आता तिला धडा शिकवावा लागेल.

Post a Comment