ठरलं तर मग पूर्ण भाग 21/06/2025 एपिसोड
ठरलं तर मग – पूर्ण भाग
चैतन्य सायली आणि अर्जुनला विचारतो, "या पेंडंट बद्दल आपल्याला अजून काय माहित आहे?" तेव्हा सायली सांगू लागते, "पेंडंटचं वजन किती आहे, आणि त्याने जे पेंडंट बनवलं त्या कारागिराचं नाव आणि ८ ऑगस्ट १९९५ ला ते विकत घेतलं गेलं." ते ऐकून चैतन्य म्हणतो, "एक एक मिनिट सायली वहिनी, तू आता तारीख काय म्हणालीस?" सायली उत्तरते, "८ ऑगस्ट १९९५." तेव्हा चैतन्य म्हणतो, "ही तर साक्षीची बर्थ डेट आहे!" हे ऐकून अर्जुन आणि सायली दोघंही धक्क्यात जातात.
![]() |
| ठरलं तर मग |
चैतन्य भूतकाळात जातो. त्याला आठवतं साक्षीने त्याला ड्रॉवरमधून पावर बँक शोधायला सांगितली होती. एक डायरीही होती. साक्षी येते, "हाय स्वीटहार्ट! सापडली का माझी पावर बँक?" चैतन्य म्हणतो, "हे बघ, पावर बँक नाही पण बघ ह्या भंगारात काय सापडलं!" साक्षी त्याला थापड मारते, "भंगार काय म्हणतोस?" चैतन्य विचारतो, "कुणाचा आहे हा जुना फोटो?" ती म्हणते, "आईचा आहे." चैतन्य म्हणतो, "सॉरी! मला खरंच माहित नव्हतं. पहिल्यांदाच पाहिलाय." साक्षी सांगते, "मला माझ्या आईबद्दल फारसं काही माहिती नाही. सगळे म्हणायचे ती खूप साधी, सरळ होती – कालिंदी." चैतन्य विचारतो, "कालिंदी शिखरे?" ती म्हणते, "नाही, कालिंदी महाडीक. आईने सासरचं आडनाव कधी लावलं नाही."
चैतन्यला हे आठवतं आणि तो सायलीला विचारतो, "त्या पेंडंट बनवणाऱ्या बाईचं नाव काय?" सायली म्हणते, "कालिंदी." चैतन्य विचारतो, "पुढे काय आडनाव?" तेव्हा अर्जुन आणि सायली एकत्र म्हणतात, "महाडीक!" चैतन्य धक्क्यात जातो, "कालिंदी महाडीक म्हणजे साक्षीची आई!" अर्जुन म्हणतो, "सगळे डॉट्स जोडले गेलेत – YES पेंडंट, कालिंदी महाडीक, साक्षी शिखरे." तेवढ्यात प्रिया कान लावून सगळं ऐकते.
सायली म्हणते, "कोल्हापूर म्हणजे साक्षीचं आजोळ असावं." अर्जुन सांगतो, "हो, तसंच आहे." चैतन्य म्हणतो, "साक्षीच्या तोंडून मी कोल्हापूर ऐकलंय." सगळं बोलणं प्रिया ऐकते. साक्षीविरोधात पुरावे मिळालेत याचा अर्जुनला आनंद होतो. बाहेर प्रिया कान लावत असते. तेव्हा कल्पना तिला पाहते आणि विचारते, "तू कान का लावत होतीस?" प्रिया घाबरते आणि खोटं बोलते. कल्पना झापते, "हे घर आहे. अशी वागणं योग्य नाही." अर्जुन म्हणतो, "मम्मालाही आता सगळं समजलं."
प्रिया तिच्या खोलीत जाऊन संतापते. म्हणते, "मी इतके महिने नाटक केलं – छान सून असल्याचं. आता सहन होत नाही. एकदा संपत्ती माझ्या नावावर झाली की सगळ्यांना घराबाहेर काढणार!"
सायली म्हणते, "आपल्याकडे पुरावा आहे, पण तो सिद्ध कसा करणार?" अर्जुन म्हणतो, "साक्षीकडे उरलेला पेंडंट असू शकतो." सायली म्हणते, "ती ठेवून असणार, तो महागडा आहे." अर्जुन विचारतो, "आपण तो शोधूया का?" सायली म्हणते, "हो." पण मग त्यांना आठवतं – आधीचे पुरावे आगीत नष्ट झाले होते. अर्जुन सांगतो, "फक्त सोन्याचा तुकडा आणि व्हिजिटिंग कार्ड आपल्या जवळ आहे." पण ते कोर्टात कसं सादर करायचं?
दुसऱ्या दिवशी सायली स्वयंपाकघरात असते. विमल तिला कालच्या भाज्यांबद्दल सांगते. सायली चिडते – "प्रिया अन्न वाया घालवते." मग ती ताट आणि चमचा वाजवायला लागते. सगळे जमा होतात. सायली म्हणते, "या घरात अन्न वाया जात नाही." प्रिया म्हणते, "माझा खायचा हक्क आहे!" प्रताप म्हणतो, "घराचे नियम आहेत!" सायली म्हणते, "हे कुटुंब आहे, नियम पाळायचे."
सायली म्हणते, "गंमत करूया – बागेत जाऊया." प्रिया नकार देते, पण कल्पना, प्रताप, पूर्णा आजी सगळे तयार होतात. सगळे बागेत जातात. सायली बीयांच्या पुड्या देते. सगळे विचारात – काय उपक्रम आहे? सायली सांगते, "आपण आज थोडी शेती करणार आहोत." सर्वजण सायलीकडे पाहतात.
भागाच्या शेवटी, सायली वेशांतर करून साक्षीच्या खोलीत शिरते. ड्रॉवरमध्ये लॉकेट शोधते. अर्जुन फोनवर म्हणतो, "पटकन बाहेर ये!" पण तेवढ्यात साक्षी तिच्या खांद्यावर हात ठेवते...

Post a Comment